24 October 2020

News Flash

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरण: रियाने उघड केलेल्या कलाकारांच्या यादीत सारा अली खान, रकुलप्रीतचा समावेश?

एनसीबीने केलेल्या चौकशीमध्ये रियाने घेतली २५ बड्या कलाकारांची नाव

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशियत आरोपी रिया चक्रवर्ती हिला ड्रग्स सेवनासह अन्य आरोपांखाली मंगळवारी अटक करण्यात आली. अमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) ही कारवाई केली. त्यापूर्वी झालेल्या चौकशीमध्ये रियाने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे या चौकशीमध्ये रियाने २५ बड्या कलाकारांची नावं घेतली होती. यात सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांचा समावेश असल्याचं ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

रियाला अटक करण्यापूर्वी एनसीबीने तिची चौकशी केली होती. या चौकशीमध्ये तिने बॉलिवूडमध्ये चालणाऱ्या ड्रग्स पार्ट्यांविषयी काही खुलासे केले होते. तसंच २५ बड्या कलाकारांची नावंदेखील घेतली होती. यामध्येच आता सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि फॅशन डिझायन सिमोन खंबाटा यांची नावं समोर आली आहे. त्यामुळे एनसीबी आता या तिघींविरोधात पुरावे गोळा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सुरुवातीला रियाची चौकशी करण्यास सुरुवात केली तेव्हाच तिने अनेक बड्या कलाकारांची नावं सांगितली होती. तसंच या ड्रग्स रॅकेटमध्ये कलाविश्वातील कोणत्या व्यक्तींचा समावेश आहे, हे ड्रग्स कुठून येतात, ते कोणाला पुरवले जातात, अशा अनेक प्रश्नांची उत्तर रियाने दिली आहे, असं एनसीबीने न्यायालयात सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2020 9:08 am

Web Title: drugs case sara ali khan rakul preet singh and simone khambatta on ncb radar ssj 93
Next Stories
1 अरुणाचल प्रदेशच्या ‘त्या’ पाच तरूणांना चीन आज भारताकडे सोपवणार!
2 आसियान देशांनी चीनविरोधात कारवाई करावी : अमेरिका
3 देशात मे महिन्यातच ६४ लाख बाधित
Just Now!
X