इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. अत्यंत महत्त्वाची अशी ही घोषणा आहे. करोनाचं संकट आणि लॉकडाउन यामुळे जी स्थिती निर्माण झाली आहे त्यातून दिलासा देण्यासाठी २० लाख कोटींचं पॅकेज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं. या २० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये काय काय असणार आहे यासंदर्भातली पत्रकार परिषद निर्मला सीतारामन घेत आहेत. त्या दरम्यानच त्यांनी ही घोषणा केली.

२०१९-२० या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याला केंद्र सरकारने मुदत वाढ दिली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत ही मुदतवाढ असणार आहे असं नुकतंच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं आहे.

आणखी काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?

१०० कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या छोट्या आणि मध्यम व्यवसायांना आत्मनिर्भर योजनेतून कर्ज देण्यात येईल

२५ कोटींपर्यंत कर्ज मिळण्याची सोय या योजनेत आहे. या कर्जासाठी गॅरंटीची आवश्यकता भासणार नाही

MSME सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची व्याख्या बदलली

छोटे उद्योग प्रगती करुन मोठे होऊ शकत नव्हते. कारण त्यांना छोटे उद्योग म्हणून मिळणारे फायदे त्यांना उलाढाल वाढल्यावर मिळत नाहीत आणि ते मोठ्या स्पर्धेत टीकू शकत नाहीत. म्हणून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची MSME ची व्याख्या बदलली

उत्पादन हा निकष असणार नाही. उलाढाल आणि गुंतवणूक यानुसार सूक्ष्म आणि लघु आणि मध्यम उद्योगांची वर्गवारी करण्यात येईल. त्यानुसार त्यांना सेवा उद्योगांनाही हेच नियम लागू होणार. आधीचे निकष बदलून ते आता वाढवण्यात आले आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं.