करदात्यांसाठी एक चांगली बातमी आहे. केंद्र सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची मुदत एका महिन्याने वाढवली आहे. ज्या करदात्यांची मुदत ३१ जुलैला संपते आहे त्या करदात्यांना आयटी रिटर्न्स भरण्यासाठी आता १ महिना वाढीव मिळाला आहे. अर्थमंत्रालयाने ट्विट करत यासंदर्भातली माहिती दिली आहे. CBDT अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने ज्या करदात्यांची कर विवरण पत्र भरण्याची मुदत ३१ जुलै रोजी संपत होती त्या करदात्यांना १ महिन्यची मुदत वाढवून दिली.

आयटी रिटर्न्स भरताना करदात्यांना जीएसटीची माहिती द्यावी लागणार आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ३ महिने व्हॅट कायदा व ९ महिने जीएसटी कायदा लागू होता. या आधी अप्रत्यक्ष कर कायद्याची उलाढाल व इतर माहिती इन्कम टॅक्स रिटर्न्स द्यावयाची गरज नव्हती, परंतु आता शासनाने आयटी रिटर्न्समध्ये जीएसटीची माहिती नमूद करावयास सांगण्यात आले आहे.