News Flash

नागपाल यांनी माफी मागावी – अहमद हसन

प्रशासकीय सेवेतील निलंबित अधिकारी दुर्गा नागपाल यांनी माफी मागावी, अशी सूचना उत्तर प्रदेशचे एक वरिष्ठ मंत्री अहमद हसन यांनी केली आहे. या प्रकरणी प्रसारमाध्यमे आणि

| August 6, 2013 05:33 am

प्रशासकीय सेवेतील निलंबित अधिकारी दुर्गा नागपाल यांनी माफी मागावी, अशी सूचना उत्तर प्रदेशचे एक वरिष्ठ मंत्री अहमद हसन यांनी केली आहे. या प्रकरणी प्रसारमाध्यमे आणि अधिकारी आपली विश्वासार्हता कमी करीत आहेत, असे उपदेशाचे डोस हसन यांनी दिले.
या मुद्दय़ाला विनाकारण महत्त्व दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सेवेत कुचराई केल्याबद्दल स्थानिक गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर नागपाल यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचा दावा हसन यांनी केला. माध्यमांनी हा मुद्दा विनाकारण उचलून धरल्यामुळे नागपाल या अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही लोकप्रिय झाल्या आहेत, असा शेरा हसन यांनी मारला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 5:33 am

Web Title: durga nagpal should apologise says sp minister
Next Stories
1 हल्लेखोर पाकिस्तानचे जवान नव्हते, दहशतवादी होते – संरक्षणमंत्री
2 ‘… तर देशाची एकात्मता धोक्यात’
3 अ‍ॅपल ‘आयफोन ५एस’ येतोय..
Just Now!
X