25 September 2020

News Flash

महिला कर्मचाऱ्यांसाठी आता खास ‘ई- प्लॅटफाॅर्म’

लैगिक छळ आणि शोषणाची तक्रार करता येणार

मनेका गांधी

१६ डिसेंबर २०१२ला झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणामधील दोषींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने देशभर समाधान व्यक्त केले जात असतानाच, केंद्र सरकारने महिलांच्या सुरक्षेसंदर्भात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारच्या सेवेत असणाऱ्या महिला र्मचाऱ्यांना लैंगिक छळ आणि लैंगिक शोषणाविषयी तक्रार करण्यासाठी ई-प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी दिली. या प्लॅटफॉर्मचा वापर करून केंद्रीय कर्मचाऱ्यांना लैंगिक छळ आणि लैंगिक शोषणाविषयीच्या तक्रारींची नोंद करता येणार आहे.

“आम्ही गेली दोन-तीन वर्षे यावर काम करत आहोत. आम्ही स्थापन करत असलेल्या ई प्लॅटफॉर्मच्या मदतीने केंद्रीय सेवेत काम करणाऱ्या महिलांना लैंगिक छळ आणि लैंगिक शोषणाविषयीच्या तक्रारी नोंदवता येतील, असे गांधी यांनी सांगितले. नवी दिल्लीमध्ये यासंबंधी आयोजित केलेल्या कार्यशाळेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. हा ई- प्लॅटफॉर्म याच महिन्यात लाँच केला जाणार आहे. विविध मंत्रालयांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांकडून अशा स्वरुपाची मागणी मनेका गांधी यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय महिला आणि बालकल्याण विभागाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय महिला आणि बालकल्याण विभागाच्या वेबसाईटवर हे ई-प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहे. महिला कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर संबंधित विभाग त्यावर निर्णय घेईल, असेही गांधी यांनी सांगितले. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना अशा प्रकारचा ई-प्लॅटफॉर्म केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू होणे ही स्वागतार्ह बाब असून त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 8:33 pm

Web Title: e platform for women employees sexual harrassment
Next Stories
1 विदेशी देणग्यांची माहिती द्या, गृहमंत्रालयाची ‘आप’ला नोटीस
2 मेडिकल प्रवेशातील आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला झटका
3 एससी, एसटी प्रवर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण
Just Now!
X