पृथ्वीवर साधारण ४.६ अब्ज वर्षांपूर्वी सौरमालेच्या निर्मितीनंतर लगेच लघुग्रहांचा जो आघात झाला त्यामुळे पृथ्वीवर पाणी आले, असे वैज्ञानिकांना दिसून आले आहे.
इ.स. २००० मध्ये पृथ्वीवर पडलेल्या एका उल्कापाषाणावर केलेल्या संशोधनानुसार या उल्कापाषाणाच्या मातृ लघुग्रहामधील पाणी उल्कापाषाण तयार होताना नष्ट झाले पण त्यांचे अंतरंग मात्र उबदार होते. लघुग्रह काही लाख वर्षांपूर्वी सौरमालेच्या निर्मितीनंतर पृथ्वीवर आदळला होता.  आमच्या संशोधनानुसार हे लघुग्रहातील पाणी ग्रहांच्या निर्मितीच्यावेळी पृथ्वीवर आले असावे, तर ४.१ अब्ज ते ३.८ अब्ज वर्षांपूर्वीच्या आघातामुळे आले नसावे, असे मत मुख्य संशोधक जपानच्या टोहोक्यू विद्यापीठाचे युकी किमुरा यांनी सांगितले. किमुरा व त्यांच्या सहकाऱ्यांनी तागिश सरोवर उल्कापाषाणाचा अभ्यास केला आहे. कॅनडाच्या युकॉन भागात जानेवारी २००० मध्ये हा उल्कापाषाण कोसळला होता. वैज्ञानिकांनी असे म्हटले होते की, वैज्ञानिकांनी यात ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक वापरून उल्कापाषाणातील मॅग्नेटाइट कणांचे निरीक्षण केले. त्याचे कण उल्कापाषाणात त्रिमिती आकारात रचलेले असतात, त्यांना ‘कोलायडल क्रिस्टल’ म्हणतात. हे स्फटिक पाण्याच्या संप्लवनाच्यावेळी तयार झाले असावेत, या वेळी पदार्थाचे रूपांतर थेट बर्फातून वाफेत झाले असावे पण ते गोठण प्रक्रियेच्यावेळी घडले नसावे, असे किमुरा यांनी सांगितले.
मातृ लघुग्रहातील पाणी सौरमालेच्या निर्मितीच्या अगोदरच्या काळात नष्ट झाले असावे. यात अवकाशातील खडकांचा आंतरभाग थंड होण्यापूर्वी ही क्रिया घडली असावी, पाण्याशिवाय यातून पृथ्वीला सेंद्रिय रेणू मिळाले असावेत. त्यात कार्बनचा समावेश असलेल्या काही मूलभूत घटकांचा समावेश असावा. तंगीश सरोवरातील उल्कापाषाणात कोलॉयडल स्फटिकात सेंद्रिय थर दिसून आले, असे किमुरा यांचे मत आहे.