बिहारमध्ये सायंकाळी पाचनंतर ५.७ रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. उत्तर बंगाल व सिक्कीम येथे सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी ५.७ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप बिहारमध्ये मधुबनी, किशनगंज, पूर्वचंपारण, लखीसराय, मुंगेर येथे जाणवला. भारतीय हवामान खात्याचे सिक्कीम येथील प्रमुख गोपीनाथ राहा यांनी सांगितले की, सुमारे १०.५ सेकंद हा धक्का जाणवला.
भूकंपाचे केंद्रस्थान नेपाळमध्ये १० कि.मी खोलीवर होते. भूकंपाने कुठलीही हानी झाल्याचे वृत्त नाही.