रिश्टर स्केलवर ६.२ इतकी तीव्रता नोंदवण्यात आलेला भूकंप अफगाणिस्तान-तजाकिस्तानच्या सीमेवर झाला. संध्याकाळी ४ वाजून ११ मिनिटांनी हा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता एवढी मोठी होती की त्याचे हादरे जम्मू काश्मीर, दिल्ली, हिमाचल प्रदेश या ठिकाणी जाणवले. जम्मू काश्मीरच्या श्रीनगर भागात आणि काश्मीरच्या दऱ्यांमध्ये या भूकंपाचे मोठे हादरे बसले. तर हिमाचल प्रदेशातील कुली, शिमला या ठिकाणीही भूकंपाचे धक्के जाणवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीतील गुडगाव भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले. या सगळ्यावरूनच या भूकंपाची तीव्रता किती मोठी होती ते लक्षात येते. तजाकिस्तानातील इशकशिम या ठिकाणी ३६ किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्र आहे. अमेरिकेच्या भूगर्भ शास्त्र विभागाने ही माहिती दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earthquake hits afghanistan tajikistan border tremors felt in delhi ncr himachal jk
First published on: 09-05-2018 at 17:28 IST