25 May 2020

News Flash

अरुणाचल प्रदेश, आसामला भूकंपाचे सौम्य धक्के

आसाममधील सोनितपूर जिल्हा आणि अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्य़ास शुक्रवारी भूकंपाचे सौम्य धक्के बसले.

| December 6, 2014 03:03 am

आसाममधील सोनितपूर जिल्हा आणि अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्य़ास शुक्रवारी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. सदर भूकंप रिक्टर स्केलवर ४.८ इतक्या क्षमतेचे होते, असे भूकंप सूचक विभागाकडून सांगण्यात आले.
या भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम कामेंग जिल्ह्य़ाच्या उत्तरेकडे २७.९ अक्षांशावर आणि पूर्वेकडे ९२.५ अंश रेखांशावर होता. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमाराला हे धक्के बसले. भूकंपामुळे लोक घाबरले होते.
मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त हाती आलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2014 3:03 am

Web Title: earthquake in assam and arunachal pradesh
टॅग Earthquake
Next Stories
1 तेजस विमाने हवाई दलात सामील करणार- पर्रिकर
2 ‘एमएफएन’ दर्जावर अवलंबून
3 अ‍ॅशटन कार्टर अमेरिकेचे संरक्षणमंत्री
Just Now!
X