तीन ठार, दोनशे जखमी; विमान उड्डाणे रद्द; रस्त्यांवर खड्डे

जपानमधील दुसरे मोठे शहर असलेल्या ओसाका शहरात शक्तिशाली भूकंपात तीन ठार तर दोनशे जण जखमी झाले आहेत. दूरचित्रवाणीवर या भूकंपानंतर इमारती हलतानाची क्षणचित्रे दाखवण्यात आली. त्यात पाइप फुटून पाणी वाहत होते. २० लाख लोकसंख्येच्या या शहरात अत्यंत वर्दळीच्या वेळी हा भूकंप झाला. यात मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याचे वृत्त नाही. असे असले तरी हजारो प्रवासी अडकून पडले, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला.

Potholes on Mangalwar Bazar flyover road in nagpur
उदंड झाली वाहने अन् रस्त्यावर खड्डेच खड्डे! उपराजधानीतील सदर मंगळवारी बाजार उड्डाणपुलावर…
Russian missile attack kills 13 in Ukraine
रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील १३ जण ठार
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?
Boeing Investment In India
हवेतच विमानाचा दरवाजा निखळला; बोइंग मॅक्स कंपनीची विमानं का होतात दुर्घटनाग्रस्त?

ओसाकाच्या उत्तरेला ताकाटसुकी येथे एका नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. भिंत कोसळून ती त्याखाली सापडली. भूकंपाची तीव्रता ५.३ रिश्टर होती. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन ठार झाले असून त्यात एका ८० वर्षांच्या व दुसऱ्या ८४ वर्षांच्या व्यक्तीचा समावेश आहे. भिंत कोसळून ते मरण पावले. आग व आपत्ती व्यवस्थापन संस्थेने म्हटले आहे की, या भूकंपात दोनशे जण जखमी झाले आहेत. पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांनी सांगितले की, लोकांचे जीव वाचवण्यासाठी सरकार एकजुटीने काम करीत आहे. सरकारी प्रवक्ते योशिहिडे सुगा यांनी सांगितले की, भूकंपाचे आणखी धक्के बसण्याची शक्यता आहे. येत्या दोन तीन दिवसांत मोठय़ा प्रमाणात धक्के बसण्याची शक्यता आहे.

जपान हा पॅसिफिक रिंग ऑफ फायरमधील देश असून तेथे जगातील अनेक भूकंप व ज्वालामुखींची नोंद आहे. ११ मार्च २०११ रोजी ९ रिश्टरचा भूकंप झाला होता त्यावेळी सुनामी लाटा उसळून मोठे नुकसान होऊन हजारो लोक मरण पावले होते. त्यामुळे तीन अणुभट्टय़ा वितळून मोठी अणुदुर्घटना झाली होती. १९८६ मधील अणुदुर्घटनेनंतरची ती सर्वात मोठी दुर्घटना होती. सकाळी आठ वाजता भूकंप झाला तेव्हा लोकांची रेल्वेत बसण्यासाठी गर्दी झालेली होती.

ओसाका शहरातील मोरीगुची येथील परिचारिका कावरी इवाकिरी यांनी सांगितले की, या भूकंपामुळे पायाखालची जमीन हादरली. जपानी मापन व्यवस्थेनुसार तो ६ ते ७ रिश्टरचा भूकंप होता त्यात जमिनीवर उभे राहणे शक्य नव्हते. भूकंपामुळे ८० विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. स्थानिक रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या होत्या. स्थानिक अणुप्रकल्पांना कुठलेही नुकसान पोहोचलेले नाही असे आण्विक नियमन संस्थेने सांगितले. होंडा कंपनीच्या प्रकल्पात भूकंपानंतर काम थांबवण्यात आले. कन्साई इलेक्ट्रिकने म्हटले आहे की, १ लाख ७० हजार घरांतील वीज पुरवठा खंडित झाला होता.