30 September 2020

News Flash

न्यूझीलंड भूकंपाने हादरले!

ख्राईस्टचर्चपासून ९० किमी अंतरावरील भागाला या भूकंपामुळे तडाखा बसला आहे.

पहाटे १२.०२ वाजता हा भूकंप झाल्याने नागरिकांना रात्रीच घराबाहेर पडावे लागले. 

न्यूझीलंडला रविवारी ७.८ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला असून अमेरिकेच्या भूवैज्ञानिक संस्थेने त्सुनामीचा इशारा दिला आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या काही भागांतील वीज आणि भ्रमणध्वनी सेवा खंडित झाली आहे.

ख्राईस्टचर्चपासून ९० किमी अंतरावरील भागाला या भूकंपामुळे तडाखा बसला आहे. पाच वर्षांपूर्वी न्यूझीलंडला ६.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता. त्यात १८५ जणांचा मृत्यू झाला होता. रविवारी झालेल्या भूकंपाची तीव्रता ७.४ रिश्टर स्केल असली तरी त्याची खोली १० किलोमीटर नोंदविली गेली आहे. या भूकंपामुळे ग्रामीण भागातील इमारतींचे नुकसान झाले आहे. २०११ मधील भूकंपानंतर हा सर्वाधिक मोठा भूकंप असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

या भूकंपात कोणीही जखमी झाले नसल्याचे रुग्णवाहिका सेवेकडून सांगण्यात आले आहे. संभाव्य त्सुनामीच्या इशाऱ्यामुळे त्या दृष्टीने सुरक्षाविषयक नियोजन करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2016 2:24 am

Web Title: earthquake in new zealand
Next Stories
1 ट्रम्प यांच्या विरोधात आंदोलन सुरूच
2 ‘डिमॉनिटायझेशन’ म्हणजे काय रे भाऊ !
3 टाटा समूहातील संचालकांवर शंका घेणे दुर्भाग्यपूर्ण: सायरस मिस्त्री
Just Now!
X