इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटाला मध्यरात्रीनंतर भूकंपाचा जोरदार धक्का बसला त्यामध्ये अनेक इमारती आणि घरे कोसळली असून भूस्खलन झाल्याने ४२ जण ठार झाल्याचे वृत्त आहे.

र्किटर स्केलवर ६.२ क्षमतेच्या या भूकंपामुळे ६०० हून अनेक जण जखमी झाले आहेत, भूकंपाचा धक्का बसल्यानंतर मध्यरात्रीच्या अंधारातच भयभीत झालेले नागरिक घराबाहेर पडले. भूकंपाची तीव्रता अधिक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे, त्याचप्रमाणे मालमत्तेचे कितपत नुकसान झाले त्याबाबतची पूर्ण माहिती अद्यापही हाती आलेली नाही.

कोसळलेली घरे आणि इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी अनेक जण अडकल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. जवळपास ३०० घरे आणि आरोग्य केंद्रांचे नुकसान झाले असून सुमारे १५ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.