म्यानमारमध्ये ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला असून त्याचे धक्के ईशान्य भारत, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, दिल्ली, राजधानी क्षेत्र येथे बसले. ओडिशा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश येथेही धक्के जाणवले आहेत, असे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने सांगितले. सुरुवातीला तरी हानीचे वृत्त नाही. सायंकाळी हे धक्के बसले असून भूकंपाचे केंद्र म्यानमारमधील मावलाईकच्या आग्नेयेला ७४ किमी अंतरावर १३४ कि.मी. खोलीवर होते. अमेरिकेत या भूकंपाची नोंद ६.९ रिश्टर झाली आहे. भूकंपाने कोलकात्यात मेट्रो पाच मिनिटे थांबवावी लागली.