News Flash

अफगाणिस्तान, पाकिस्तानसह उत्तर भारताला भूकंपाचे धक्के

काबूल आणि इस्लामाबाद या दोन राजधानीच्या शहरांना भूकंपाचे लागोपाठ दोन धक्के बसले.

| December 21, 2019 03:46 am

जीवितहानीचे वृत्त नाही

नवी दिल्ली : दिल्ली-एनआरसी जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतातील अनेक भाग इतकेच नव्हे तर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तान शुक्रवारी सायंकाळी भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरले. अफगाणिस्तानच्या हिंदुकुशमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ इतकी नोंदविली गेली. भूकंपाचे धक्के बसल्याने लोकांमध्ये घबराट पसरली. मात्र या भूकंपामुळे जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप हाती आलेले नाही.

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला दिल्ली-एनआरसी, जम्मू-काश्मीर, चंडीगड, श्रीनगर, फरिदाबाद, हिमाचल प्रदेशातील चंबा आणि डलहौसी, उत्तर भारतातील नोइडा, गझियाबाद, मथुरा आणि मेरठला भूकंपाचे धक्के बसले. या धक्क्यांमुळे अनेकांच्या घरातील भांडी आणि अन्य सामान खाली पडले. भूकंपाचे धक्के बसताच भयभीत झालेल्या लोकांनी घरातून आणि कार्यालयातून त्वरित पळ काढल्याचेही वृत्त आहे.

काबूल आणि इस्लामाबाद या दोन राजधानीच्या शहरांना भूकंपाचे लागोपाठ दोन धक्के बसले. लाहोरसह पेशावर आणि र्मुीलाही भूकंपाचे धक्के बसले. भयभीत नागरिक इमारती आणि घरातून धावत बाहेर पडत असतानाची दृश्ये स्थानिक वाहिन्यांवरून दाखविण्यात येत होती. खैबर पख्तुन्वा प्रांतातही भीतीचे वातावरण पसरले होते.

स्वात, बन्नू, नौशेरा, हांगू, लक्की मारवत, बजौर, चारसद्दा, मारदन, स्वाबी, मलकंद, बुनेर शांगला, हरिपूर, अबोटाबाद, मानसेहरा, कोहिस्तान आणि कोहात येथेही भूकंपाचे धक्के बसल्याचे वृत्त दी एक्स्प्रेस ट्रिब्यूनने दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 3:46 am

Web Title: earthquake shocks northern india including afghanistan pakistan zws 70
Next Stories
1 CAA Protest : लखनौत इंटरनेटसेवा बंद
2 उन्नाव बलात्कार खटला : आमदार सेनगरला जन्मठेप
3 जयपूर बॉम्बस्फोटप्रकरणी चौघांना मृत्युदंडाची शिक्षा
Just Now!
X