दिल्लीसह उत्तर भारताला भूकंपाचे धक्के बसले आहेत. दिल्ली, एनसीआर, उत्तराखंड, देहरादूनला भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जवळपास तीस सेकंद दिल्लीसह उत्तर भारताला भूकंपाचे धक्के बसले आहेत. सोमवारी रात्री १० वाजून ३३ मिनिटांनी दिल्लीसह उत्तर भारताला भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ५.८ रिश्टर स्केल इतकी आहे. उत्तराखंडातील रुद्रप्रयागमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

युरोपियन-मेडिटेरानेन सेस्मोलॉजिकल सेंटर (ईएमएससी) आणि युनायटेड स्टेट जिओलॉजिक सर्वे (युएसजीएस) यांनी ३३ किलोमीटर खोलवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती दिली आहे. उत्तराखंडमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू होता. यामुळे दिल्लीसह एनसीआर, देहरादून, चंदिगड, आग्र्याला भूकंपाचे धक्के जाणवल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे.