News Flash

१२ तासांमध्ये तीन मोठे भूकंप; पॅसिफिकमध्ये त्सुनामीचा इशारा तर मिझोरम आणि हिंदकुशही हादरले

तीन भूकंपांपैकी सर्वात मोठा भूकंप ७.७ रिश्टर स्केलचा

१२ तासांमध्ये तीन मोठे भूकंप; पॅसिफिकमध्ये त्सुनामीचा इशारा तर मिझोरम आणि हिंदकुशही हादरले
प्रातिनिधिक फोटो

मागील १२ तासांमध्ये ऑस्ट्रेलियापासून ते हिंदकुश पर्वतांच्या प्रदेशामध्ये तीन भूकंपाचे धक्के बसले आहेत. विशेष म्हणजे या तीन धक्क्यांपैकी एक धक्का भारतातील मिझोरममध्येही बसला आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय तसेच एएफपी या वृत्तसंस्थांनी दिलं आहे. ऑस्ट्रेलियाजवळच्या पॅसिफिक महासागराच्या परिसराध्ये समुद्राखाली १० किमी अंतरावर काल म्हणजेच बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास पहिला धक्का बसला. समुद्राखाली झालेला हा भूकंप ७.७ रिश्टर स्केल इतका मोठा असल्याने या भूकंपानंतर न्यूझीलंड, वनूआतु आणि न्यू कॅलेडोनिया या देशांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाची तिव्रता अधिक असल्याने या देशांमधील नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय वेळेनुसार बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दक्षिण पॅसिफिकमधील लॉयल्टी बेटांजवळ समुद्राच्या तळाखाली १० किमी अंतरावर मोठा भूकंप झाला. हा भूकंप ७.७ रिश्टर स्केलचा होता असं अमेरिकन जिओलॉजिकल सर्वे या संस्थेनं स्पष्ट केल्याचं एएफपीने म्हटलं आहे. या भूकंपानंतर न्यूझीलंड, वनूआतु आणि न्यू कॅलेडोनियाला त्सुनामीचा इशारा देण्यात आला.

न्यूझीलंडमधील सरकारी यंत्रणांनी नागरिकांना त्सुनामीचा धोका लक्षात घेता समुद्रकिनारी न जाण्याचा इशाराही जारी केलाय.

दक्षिण पॅसिफिकमधील या भूकंपानंतर काही तासांनी मिझोरममध्येही भूकंपाचा झटका जाणवला. रात्री एकच्या सुमारास चंपाई येथे हा भूकंपाचा झटका जाणवल्याचे एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. हा भूकंप ३.१  रिश्टर स्केलचा

मिझोरमनंतर काही तासांनी अफगाणिस्तानमध्येही भूकंपाचा झटका बसला. हिंदकुश पर्वतराजीत बसलेला हा भूकंपाचा झटका ४.९ रिश्टर स्केलचा होता. नॅशनल सेंटर फॉर सिसमोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार भारतीय वेळेनुसार रात्री चारच्या सुमारास हिंदकुश पर्वत रांगांच्या भागामध्ये ४.९  रिश्टर स्केलचा हा भूकंप जाणवला.

दक्षिण पॅसिफिकमधील भूकंप हा जमीनीखाली खोल अंतरावर झाल्याने मिझोरम आणि हिंदकुशमधील भूकंप हे आफ्टर शॉक प्रकारातील असल्याचा अंदाज सध्या व्यक्त केला जातोय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2021 8:34 am

Web Title: earthquake tsunami warning in south pacific and champhai mizoram and hindu kush in afghanistan scsg 91
Next Stories
1 उत्तराखंड दुर्घटनेतील १७० जणांचा शोध सुरूच
2 व्ही. के. सिंह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा!
3 रिपब्लिकन पक्षात फूट
Just Now!
X