कामातील सहकाऱ्यांसोबत जाऊन जेवण करण्या ऐवजी आपल्या कामाच्या डेस्कवरच एकट्याने केलेले जेवण तुम्हाला अधिक कार्यक्षम बनवते, असे एका नव्याने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.
मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवन केल्यामुळे स्वत:वरिल ताबा जातो. मात्र, हेच जेवण कामाच्या ठिकाणी एकांतामध्ये केल्यास कार्यक्षमता वाढते. असा दावा हा अभ्यास करणाऱ्या जर्मनी, बर्लीन स्थित हम्बोल्डट विद्यापीठाच्या संशोधनकांनी केला आहे.
या संशोधनामध्ये सहभाग घेतलेल्यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी एका ठरावीक वेळेत एकांतात जेवण केले. काहीजणांनी एक तासाची सुट्टी घेत रेस्टॉरंटमध्ये मित्रांसोबत जेवण केले. दोन्ही ठिकाणचे जेवण सारखेच होते. त्यानंतरच्या निरिक्षणातून रेस्टॉरंटमध्ये मित्रांसोबत जेवण केलेले अतिशय स्थूल व निस्तेज झाल्याचे आढळले. त्याउलट आपल्या कामाच्या ठिकाणी जेवण केलेले कामगार अधिक कार्यक्षमतेने कामकरताना आढळल्याचे हा अभ्यास म्हणतो.