इबोला विषाणूच्या आतापर्यंतच्या सर्वात जास्त संसर्गात २४०० जण मरण पावले आहेत, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. क्युबाने इबोलाचा सामना करण्यासाठी सर्वात मोठे वैद्यकीय पथक पश्चिम आफ्रिकी देशांमध्ये पाठवले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख मार्गारेट चॅन यांनी सांगितले की, इबोलाचा संसर्ग वाढत आहे व त्याला आंतरराष्ट्रीय समुदायाने तातडीने प्रतिसाद देण्याची गरज आहे. इबोलाच्या बळींची संख्या वेगाने वाढत आहे. संयुक्त राष्ट्रांनी लायबेरिया, गिनी, सिएरा लिओन या देशांना इबोलाग्रस्त जाहीर केले असून ४७८४ जणांना विषाणूची लागण झाली आहे.