चालू आर्थिक वर्षातील प्रगती नमूद करणारा आर्थिक पाहणी अहवाल शुक्रवारी लोकसभेमध्ये सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी हा अहवाल सादर केला. विकासाचा वेग वाढत असून, महागाई कमी होत असल्याचे या पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर पुढील आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर सात ते पावणे आठ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाजही अहवालात नमूद करण्यात आला आहे.
आर्थिक पाहणी अहवालातील ठळक मुद्दे
चालू आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात नमूद केल्यापेक्षा अधिक कर महसूल जमा होण्याची शक्यता
२०१५-१६ मधील औद्योगिक विकास दरही वाढण्याचा अंदाज
पुढील आर्थिक वर्ष वित्तीय दृष्टिकोनातून अधिक आव्हानात्मक
चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट ३.९ टक्क्यांपर्यंत राहणार. सरकारने अंदाजित केलेला ७.६ टक्के सकल राष्ट्रीय उत्पादन दर कायम राहण्याची शक्यता
वेतन आयोगामुळे किंमतीवर कोणताही परिणाम होणार नाही
मध्यम स्वरुपाच्या उद्योगांमुळे रोजगार निर्मिती. त्यामुळे बेरोजगारीचा दर कमी
आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्थिरता असूनही भारतीय बाजार स्थिर