News Flash

आर्थिक दुर्बलांसाठीच्या आरक्षणाची गुजरातमध्ये आजपासून अंमलबजावणी

१४ जानेवारीपासून अंमलबजावणी करणार असल्याचे गुजरात सरकारने रविवारी सांगितले.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

खुल्या वर्गातील आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या लोकांना सरकारी नोकऱ्या आणि उच्चशिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याची आपण १४ जानेवारीपासून अंमलबजावणी करणार असल्याचे गुजरात सरकारने रविवारी सांगितले.

१० टक्के आरक्षण देण्याबाबतच्या घटनादुरुस्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी मंजुरी दिली होती. खुल्या वर्गातील आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या लोकांना १४ जानेवारीच्या उत्तरायणापासून सरकारी नोकऱ्या आणि उच्चशिक्षणात १० टक्के आरक्षण मिळेल, असे राज्य सरकारने जारी केलेल्या एका निवेदनात सांगितले.

ज्या प्रवेश आणि नोकऱ्यांच्या जाहिराती १४ जानेवारीपूर्वी काढण्यात आल्या, पण त्यांची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झालेली नाही त्यांच्या बाबतीतही नव्या राखीव जागांची (कोटा) अंमलबजावणी केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये, प्रवेश प्रक्रिया किंवा नोकऱ्यांबाबत नव्याने घोषणा करावी लागेल, असे यात नमूद केले आहे. तथापि, नियुक्त्या किंवा प्रवेश प्रक्रिया- चाचणी किंवा मुलाखती- १४ जानेवारीपूर्वी सुरू झाली असेल, तर १० टक्के आरक्षण लागू होणार नाही, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आलेोहे.

या घोषणेमुळे संभ्रम निर्माण होईल, असे सांगून गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित चावडा यांनी त्यावर टीका केली. आपण या तरतुदीची १४ जानेवारीपासून अंमलबजावणी करणार असल्याचे सरकार म्हणते, मात्र त्या दिवशी उत्तरायणची सुटी आहे. या घोषणेमागील तर्क आणि तिची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी चावडा यांनी केली.

आनंदीबेन पटेल या मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्यांसाठी अशाचप्रकारे १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती असल्यामुळे याबाबत सद्य:स्थिती काय आहे याचेही भाजप सरकारने स्पष्टीकरण द्यावे, असे चावडा म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 12:29 am

Web Title: economic reservation in gujarat
Next Stories
1 Video : बिहारमध्ये गुंडाराज, महिलेला टोळक्याची भरदिवसा मारहाण
2 प्रयागराज कुंभ : ‘गोल्डन बाबा’ पोलिसांच्या ताब्यात
3 उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस स्वबळावर, आश्यर्यकारक निकालांची वर्तवली शक्यता
Just Now!
X