07 April 2020

News Flash

अर्थव्यवस्थेचे चित्र अधिक गंभीर

अन्नधान्याच्या किमतीमुळे महागाईवाढ; औद्योगिक उत्पादन दर डिसेंबरमध्ये शून्यात

प्रातिनिधीक छायाचित्र

अन्नधान्याच्या किमतीमुळे महागाईवाढ; औद्योगिक उत्पादन दर डिसेंबरमध्ये शून्यात

नवी दिल्ली : आधीच सुखावह नसलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे चक्र आणखी मंदावले आहे. वाढत्या अन्नधान्याच्या किमतीने महागाईत इंधन ओतले, तर औद्योगिक उत्पादन गेल्या डिसेंबरअखेर शून्यानजीक आले.

जानेवारी २०२० मधील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर थेट ७.५९ टक्क्यांवर झेपावला आहे. हा दर मे २०१४ नंतरच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहनशील अशा ४ टक्के दराच्या जवळपास दुप्पट हा दर आहे.

निर्मिती क्षेत्राची घसरण कायम असून, डिसेंबर २०१९ मध्ये देशाचा औद्योगिक उत्पादन दर ०.३ टक्क्यांनी घटला.  महागाई दर डिसेंबर २०१९ मध्ये ७.३५ टक्के होता. तर वर्षभरापूर्वी तो १.९७ टक्के होता.  वर्षभरापूर्वीच्या २.५ टक्के व आधीच्या महिन्यातील १.८ टक्क्याच्या तुलनेत यंदाचा औद्योगिक उत्पादन दर घसरती ऊर्जानिर्मिती, भांडवली वस्तुनिर्मितीमुळे शून्यानजीक रेंगाळला आहे. एप्रिल ते डिसेंबर दरम्यानही औद्योगिक उत्पादन दर ०.५ टक्केच राहिला आहे.

औद्योगिक उत्पादन शून्याच्या तळात

नवी दिल्ली : ऊर्जा, वस्तू उत्पादन निर्मितीतील सुमार प्रवासामुळे देशातील औद्योगिक उत्पादन दर पुन्हा एकदा शून्याच्या तळात विसावला आहे. गेल्या वर्षअखेरीस, डिसेंबर २०१९ मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक ०.३ टक्के नोंदला गेला आहे.

नोव्हेंबर २०१९ मध्ये १.८ टक्के उंचावल्यानंतर पुढील महिन्यात औद्योगिक उत्पादन दर पुन्हा एकदा घसरणीकडे झुकला आहे. यापूर्वी ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये तो सलग उणे स्थितीत राहिला होता.

वर्षभरापूर्वीच्या, डिसेंबर २०१८ मधील २.५ टक्क्यांच्या तुलनेत यंदा औद्योगिक उत्पादन दर खूपच मागे पडला आहे.

यंदाच्या डिसेंबरमध्ये निर्मिती क्षेत्र १.२ टक्क्यानेच विस्तारले आहे. तर ऊर्जानिर्मिती ०.१ टक्क्याने कमी झाली आहे. चालू आर्थिक वर्षांतील एप्रिल ते डिसेंबरदरम्यान औद्योगिक उत्पादन दर ०.५ टक्के नोंदला गेला आहे. तो वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील ४.७ टक्क्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे.

गॅस दरभडका :  दिल्लीतील निवडणुका संपताच घरगुती विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत सरकारने बुधवारी मोठी वाढ लागू केली. यानुसार १४.२ किलो वजनाच्या एका एलपीजी सिलिंडरमागे थेट १४४.५० रुपयांची वाढ होऊन त्याची किंमत ८५८.५० रुपये करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2020 4:55 am

Web Title: economic slowdown indian economy faces severe challenges zws 70
Next Stories
1 अहमदाबादच्या स्टेडियमवर ‘केम छो ट्रम्प’ मेळाव्याचे आयोजन
2 भारत-अमेरिका व्यापार कराराचे ट्रम्प यांचे संकेत
3 डायमंड प्रिन्सेस जहाजावर १७४ रुग्ण
Just Now!
X