News Flash

इशर अहलुवालिया यांचे निधन

१० महिने मेंदूच्या कर्करोगाशी दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली.

इशर अहलुवालिया

नवी दिल्ली : प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ इशर अहलुवालिया (वय ७४) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांनी १० महिने मेंदूच्या कर्करोगाशी दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली.

१ ऑक्टोबरला त्यांचा ७५ वा वाढदिवस होता. त्यांच्या पश्चात पती व नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष मोंतेक सिंग अहलुवालिया, पुत्र पवन व अमन असा परिवार आहे.

अहलुवालिया यांनी आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध भारतीय संशोधन परिषदेच्या (आयसीआरआयईआर) अध्यक्ष व संचालक म्हणून काम केले होते.  आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत त्यांच्या कारकीर्दीस सुरुवात झाली. नंतर त्या भारतात परत आल्या. त्यांनी इंडस्ट्रियल ग्रोथ इन इंडिया- स्टॅगनेशन सिन्स मिड सिक्स्टीज व प्रॉडक्टव्हिटी अँड ग्रोथ इन इंडियन मॅन्युफॅक्चरिंग, ट्रान्सफॉर्मिग अवर सिटीज-पोस्ट कार्ड्स ऑफ चेंज, अर्बनायझेशन इन इंडिया-चॅलेंजेस, अ‍ॅपॉरच्युनिटीज अँड दी वे फॉरवर्ड (संपादन) ही पुस्तके लिहिली.

त्या सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च या संस्थेत प्राध्यापक होत्या. ‘ब्रेकिंग थ्रू- अ मेमॉयर बाय इशर जज अहलुवालिया’ हे त्यांचे पुस्तक गेल्याच महिन्यात प्रसिद्ध झाले होते. पंजाबच्या राज्य नियोजन मंडळाच्या त्या काही काळ उपाध्यक्षा होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 1:48 am

Web Title: economist isher judge ahluwalia passes away zws 70
Next Stories
1 महासचिवपदावरून राम माधव यांना हटवले
2 मोदी सरकारला धक्का, शिरोमणी अकाली दल एनडीएतून पडणार बाहेर
3 येत्या पाच दिवसांत नवं संरक्षण उत्पादन आणि खरेदी धोरण आणणार – राजनाथ सिंह
Just Now!
X