News Flash

इक्वेडोरच्या भूकंपातील बळींची संख्या ६५४ वर

इक्वेडोरमध्ये गेल्या आठवडय़ात झालेल्या ७.८ रिश्टर तीव्रतेच्या विनाशकारी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या ६५४ वर गेली

इक्वेडोरमध्ये गेल्या आठवडय़ात झालेल्या ७.८ रिश्टर तीव्रतेच्या विनाशकारी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या ६५४ वर गेली असून आणखी ५८ लोक बेपत्ता असल्याचे तेथील सरकारने सांगितले आहे.

प्रामुख्याने किनारी भागातील शहरे जमीनदोस्त करणाऱ्या या भूकंपानंतर ११३ लोकांना वाचवण्यात आले असून सध्या २५ हजार लोक तात्पुरत्या आश्रयस्थानी राहात आहेत, अशी माहिती जोखीम व्यवस्थापन सचिवालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

२००७ साली पेरूमध्ये झालेल्या भूकंपबळींपेक्षा इक्वेडोरच्या भूकंपात बळी गेलेल्यांची संख्या जास्त झाली आहे. १९९९ साली कोलंबियात एक हजाराहून अधिक बळी घेणाऱ्या भूकंपानंतर दक्षिण अमेरिकेतील हा सगळ्यात विनाशकारी भूकंप आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 12:02 am

Web Title: ecuador earthquake death toll tops 654
Next Stories
1 राष्ट्रवादावर चर्चेसाठी तुम्हाला निवडून दिलेले नाही, कन्हैयाची पुन्हा मोदींवर टीका
2 RSS कडून देशातील विद्यापीठे चालविण्याचा घाट, रोहित वेमुलाच्या सहकाऱ्याचा आरोप
3 परराष्ट्र मंत्रालयाकडून विजय मल्ल्याचा पासपोर्ट रद्द
Just Now!
X