23 October 2018

News Flash

आंध्र बँकेचे माजी संचालक अनुप प्रकाश गर्ग यांना कर्ज घोटाळा प्रकरणी अटक

कर्ज घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई

अंमलबजावणी संचलनालय अर्थात (ED) ने ५ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आंध्र बँकेचे माजी संचालक अनुप प्रकाश गर्ग यांना अटक केली आहे.  शुक्रवारी उशिरा ही कारवाई करण्यात आली. गुजरातमधील एका फार्मा फर्मला देण्यात आलेल्या कर्जासंदर्भात ही कारवाई करण्यात आली. याआधी नोव्हेंबर महिन्यात याचप्रकरणी उद्योजक गगन दिवाण यांनाही अटक करण्यात आली आहे. त्याचमुळे या प्रकरणातली ही दुसरी कारवाई आहे. अनुप प्रकाश गर्ग यांना विशेष न्यायालयासमोर हजर केले जाईल असेही ईडीने स्पष्ट केले आहे. संदेसारा ग्रुपवर ईडीने छापा मारला. त्या छाप्यात मिळालेल्या डायरीत अनुप प्रकाश गर्ग यांचेही नाव आढळले आहे म्हणूनच त्यांना अटक करण्यात आली.

सांदेसारा ग्रुपवर बँकांकडून कर्ज घेऊन ते हडप केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आता याच प्रकरणी गर्ग यांना अटक करण्यात आली आहे. या डायरीत काही वादग्रस्त नोंदी आहेत तसेच सांदेसारा ब्रदर्सने काही लोकांची नावे लिहिली आहेत ज्यामध्ये एक नाव गर्ग यांचेही आहे. कोलकाता येथील शेल कंपन्यामध्येही गर्ग यांनी पैसे गुंतवल्याची माहिती यामुळे समोर आली आहे.

सीबीआयने केलेल्या तपासानंतर डायरीतले सत्य उघड झाले होते. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयरनंतरच गर्ग यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गर्ग हे आंध्रा बँकेचे संचालक म्हणून काम करत असताना १.५२ कोटी इतक्या मोठ्या रकमेच्या रोखीच्या नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे अनुप प्रकाश गर्ग यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

First Published on January 13, 2018 3:40 pm

Web Title: ed arrests former andhra bank director anup prakash garg in loan fraud case