पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला सक्तवसूली संचलनालयाने मोठा दणका दिला आहे. त्याची तब्बल २४ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. याशिवाय त्याची किंमती वाहनं, बँक खात्यांचा देखील ताबा घेण्यात आला आहे. दुबईत असलेल्या त्याच्या तीन संपत्तींवर ईडीचे लक्ष होते. या संपत्तींची किंमत जवळपास २४.७७ कोटी आहे.

तब्बल १३ हजार कोटींच्या या बँक घोटाळ्यातील सह आरोपी मेहुल चोक्सी सध्या अँटिग्वामध्ये आहे. भारत सरकारकडून फरार उद्योजक नीरव मोदी व मेहुल चोक्सीला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पीएनबी’ घोटाळा उघड होऊन गुन्हा नोंदविला जाण्यापूर्वीच चोक्सी भारतातून फरार झाला होता.