25 January 2021

News Flash

तबलिगी जमातच्या प्रमुखावर ईडीकडून गुन्हा दाखल, परदेशातून मिळणारी आर्थिक मदत लपवल्याचा संशय

सक्तवसुली संचलनालयाकडून मौलाना साद यांच्या आठ सहकाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे

तबलिगी जमात मरकजचे प्रमुख मौलाना साद यांच्याविरोधात पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपाखाली सक्तवसुली संचलनालयाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मौलाना साद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर काही तासातच ईडीकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मौलाना साद यांच्या संस्थेला परदेशातून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळत असून त्याची कोणतीही माहिती सरकारला देण्यात आली नसल्याचा सक्तवसुली संचलनालयाला संशय आहे. सक्तवसुली संचलनालयाकडून मौलाना साद यांच्या आठ सहकाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांनी सांगितल्यानुसार, मरकजच्या सर्व खात्यांची छाननी केली जात आहे. सक्तवसुली संचलनालय देखील मरकजला मिळालेला निधी मनी लॉण्ड्रिंगचा भाग होता की हवाला चॅनेल्सचा वापर करण्यात आला याचा तपास करत आहेत. दरम्यान आयकर विभागदेखील जाहीर न केलेलं उत्पन्न, विश्वस्तांकडून आयकर चोरीचा प्रयत्न आणि निधीचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करण्यात आला का ? याचा तपास करणार आहे.

दिल्ली पोलीस क्राइम ब्रांच मरकजच्या फंडिंगबाबतचा अहवाल सक्तवसुली संचलनालय आणि आयकर विभागाकडे सोपवणार आहे. मौलाना साद अद्याप चौकशीसाठी क्राइम ब्रांचसमोर हजर झालेले नाहीत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, क्राइम ब्रांचचा अहवाल आणि मौलाना साद यांचा जबाब आर्थिक तपास यंत्रणांकडून वापरला जाणार आहे. गेल्या काही दिवसांत मौलाना साद यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले असल्याचं लक्षात आलं आहे.

मरकजला दोन वेळा नोटीस पाठवूनदेखील अद्यापही त्यांनी बँक खात्यांची माहिती शेअर केलेली नाही. मौलाना साद यांची क्वारंटाइन वेळ संपली अशून क्राइम ब्रांच लवकरच त्यांचा जबाब नोंदवणार आहे. त्यानंतर पोलीस अटकेसंबंधी निर्णय घेणार आहे.

मौलाना साद यांनी लॉकडाउनमध्य तबलिगी जमातच्या सदस्यांना एकत्रित करत केलेल्या कार्यक्रमामुळे अनेकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक करोनाबाधित झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 7:48 am

Web Title: ed lodges money laundering case against tablighi jamaat markaz chief maulana saad sgy 87
Next Stories
1 Coronavirus Live Updates: महाराष्ट्रात करोनाचे २८८ नवे रुग्ण, संख्या ३२०० च्याही पुढे
2 करोना आणि आर्थिक संकटाविरोधातील लढा एकत्रितच हवा – राहुल
3 जगातील बळींची संख्या १,४२,७०७
Just Now!
X