News Flash

चिदंबरम यांच्या मुलाच्या चेन्नईतील कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाचा छापा

माझा किंवा माझ्या कुटुंबातील कोणाचाही या कंपन्यांशी संबंध नसल्याचे कार्ती चिदंबरम यांनी आज स्पष्ट केले

यापूर्वी २ डिसेंबर रोजी कार्ती चिदंबरम यांच्या मित्रांच्या अनेक व्यावसायिक आस्थापनांवर प्राप्तिकर व सक्तवसुली संचालनालयाच्या पथकांनी छापे टाकले होते.

सक्तवसुली संचालनालयानकडून (ईडी) बुधवारी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या चेन्नईतील कार्यालयावर छापा टाकण्यात आला. हा छापा टाकण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, ईडीने विनाकारण आपल्या कार्यालयावर छापा टाकल्याची प्रतिक्रिया कार्ती चिदंबरम यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी २ डिसेंबर रोजी कार्ती चिदंबरम यांच्या मित्रांच्या अनेक व्यावसायिक आस्थापनांवर प्राप्तिकर व सक्तवसुली संचालनालयाच्या पथकांनी छापे टाकले होते. छापे टाकण्यात आलेल्या खासगी नेत्र चिकित्सा समूहासह काही कंपन्यांमध्ये कार्ती चिदंबरम यांचे समभाग असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती. मात्र, माझा किंवा माझ्या कुटुंबातील कोणाचाही या कंपन्यांशी संबंध नसल्याचे कार्ती चिदंबरम यांनी आज स्पष्ट केले. सूत्रांच्या माहितीनुसार, एअरसेल व मॅक्सिस या कंपन्यांमधील पैशांचे बेकायदेशीर व्यवहार आणि या आस्थापनांनी प्राप्तिकर चुकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 5:33 pm

Web Title: ed raids karti chidambaram office in chennai
टॅग : Congress,Ed,Raid
Next Stories
1 पाकिस्तानशी युद्ध हा पर्याय नव्हे; दहशतवाद संपविण्यासाठी चर्चेची गरज- स्वराज
2 विरोधात घोषणा देणाऱ्या ‘आप’च्या खासदाराला मोदींकडून पाणी!
3 पुढील वर्षात देशात १०० रेल्वे स्थानकांवर ‘वाय-फाय’ची सुविधा, ‘गुगल’च्या सुंदर पिचईंची घोषणा
Just Now!
X