गोव्यातील लुइस बर्जर लाचप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि गोवा पोलिसांनी गुरुवारी राज्यातील विविध ठिकाणांसह माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या निवासस्थानाची झडती घेतली. त्याचप्रमाणे लाचप्रकरणी कामत यांच्या नातेवाईकांचीही चौकशी केली.
जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीने एका प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला, त्यामध्ये अमेरिकेच्या सल्लागार कंपनीने काही जणांना लाच दिल्याचा आरोप असून त्याबाबत गहाळ झालेली नस्ती शोधण्याचे काम सुरू आहे, असे गुन्हा अन्वेषण विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
कामत यांचे मेहुणे पिंकी लवांदे यांची पणजीतील त्यांच्या कार्यालयात ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली.