07 July 2020

News Flash

पत्रकार शुजात बुखारींची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये संपादक शुजात बुखारी हे ठार झाले

पहिले छायाचित्र मृत शुजात बुखारी तर दुसऱ्या छायाचित्रात बुखारी यांच्यावर हल्ला करण्यात आलेले ठिकाण

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार, संपादक शुजात बुखारी आणि त्यांचा सुरक्षा रक्षक दोघे ठार झाले. बुखारी श्रीनगरमधील रायझिंग काश्मीर या स्थानिक वृत्तपत्राचे संपादक आहेत. ही घटना सांयकाळच्या सुमारास घडली. हल्ल्याबाबत अधिक माहिती समजू शकलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे दिसत आहेत. ईदनंतर भारतीय सुरक्षा दले दहशतवाद्यांविरोधात पुन्हा एकदा आक्रमक धोरण अवलंबण्याची शक्यता आहे.

सांयकाळच्या सुमारास श्रीनगरमधील प्रेस कॉलनीतील आपल्या कार्यालयातून बाहेर पडताना बुखारी व त्यांच्या सुरक्षारक्षकावर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात बुखारी हे ठार झाले तर सुरक्षा रक्षकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यापूर्वी बुखारी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हापासून त्यांना सुरक्षारक्षक पुरवण्यात आला होता. बुखारी यांची धाडसी पत्रकार म्हणून ओळख होती.

मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून ईदच्या आधी दहशतवाद्यांनी केलेला हा भ्याड हल्ला असल्याची टीका केली. त्यांनी बुखारी कुटुंबीयांचे सांत्वनही केले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे.

दरम्यान, हल्ल्यानंतर दहशतवादी पसार झाले. किती दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, बुखारी यांच्यावरच का हल्ला केला याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2018 8:15 pm

Web Title: editor of rising kashmir newspaper shujaat bukhari shot dead by terrorists in srinagar city
Next Stories
1 अमेरिकेत टॉलिवूड अभिनेत्रींचे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या भारतीय जोडप्याला अटक
2 भरारी ! जनरल मोटर्सच्या सीएफओपदी भारतीय वंशाच्या दिव्या सूर्यदेवरा
3 वीरपत्नी आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी बिग बींकडून दोन कोटी रुपयांची मदत
Just Now!
X