News Flash

Covid 19 : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक एम्स रुग्णालयात दाखल

करोनातून बरे झाल्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले आहेत

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. करोनातून बरे झाल्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. एम्सच्या अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेसंदर्भातील आजची घोषणाही पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिक्षणमंत्री निशंक यांनी २१ एप्रिल रोजी ट्वीटद्वारे माहिती दिली होती की त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासह ते म्हणाले होते की, जे लोक माझ्या संपर्कात आले त्यांनी करोना चाचणी करावी. मंत्रालयाचे काम नेहमीप्रमाणे सुरूच राहिल, असेही त्यांनी म्हटले होते.

करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवाला. करोनातून बरे झाल्यानंतर देखील अनेक जणांना व्याधींनी घेरले आहे. अनेकांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे पुन्हा रुग्णालयात भरती होण्याची परिस्थिती ओढावली आहे.

देशात गेल्या २४ तासात आढळले १,२७,५१० रुग्ण

देशात गेल्या २४ तासात १,२७,५१० रुग्ण आढळले. ही गेल्या ४८ दिवसातील सर्वात कमी संख्या आहे. तसेच मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील घट होतांना दिसत आहेत. गेल्या २४ तासात २,७९५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २,५५,२८७ जणांनी करोनावर मात केली आहे. डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या बाधित रुग्णांपेक्षा जास्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 12:39 pm

Web Title: education minister ramesh pokhriyal nishank in aiims srk 94
Next Stories
1 बाबा रामदेव आणि योगी आदित्यनाथ आता थेट अभ्यासक्रमात
2 करोनामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; एकाच वेळी करावे लागले पाच जणांचे अंत्यविधी
3 मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र, केली ‘ही’ विनंती
Just Now!
X