जम्मू काश्मीरच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका रिता जतिंदर यांची टीव्हीवर मुलाखत सुरु होती. या मुलाखतीतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि काही सेकंदात त्यांचे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार रिता जतिंदर या गुड मॉर्निंग जम्मू काश्मीर या लाइव्ह कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात त्यांना टीव्ही अँकरने प्रश्न विचारले त्यावर त्या बोलत होत्या. मात्र बोलता बोलता त्या अचानक शांत झाल्या आणि बेशुद्ध होऊन कोसळल्या.

टीव्ही शोमध्ये असलेल्या दोन्ही टीव्ही अँकर्सना क्षणभर काय होते आहे ते समजलेच नाही. रिता जतिंदर अशाप्रकारे अचानाक खुर्चीवरून कोसळल्याने लाइव्ह कार्यक्रम बंद करून त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दूरदर्शनवर हा कार्यक्रम सुरू होता. जो बंद करण्यात आला.

रिता जतिंदर यांची मुलाखत सुरु होती. त्या टीव्हीवर आपल्या आयुष्याबाबत एकंदरीत जीवन प्रवासाबाबत बोलत होत्या. बोलता बोलता त्यांचा आवाज अचानक बंद झाला आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांचा आवाजही बंद झाला. ज्यानंतर त्या खुर्चीवरून कोसळल्या. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला

पाहा व्हिडिओ