यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अप्रत्यक्षरित्या मोदी सरकारवर टीका केली आहे. सध्या सरकारमध्ये बसलेले लोक पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या लोकशाही मूल्यांचा सन्मान करणारा वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

नेहरुंमुळेच भारताला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभला : शशी थरुर

काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांचे पुस्तक ‘नेहरु: द इन्वेंशन ऑफ इंडिया’ या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी त्या बोलत होत्या. आधुनिक भारताच्या निर्मितीत देशाचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या योगदानाचे स्मरण करताना सोनिया गांधी म्हणाल्या की, नेहरु यांनी ज्या लोकशाही मूल्यांना पुढे नेले. आज त्यालाच आव्हान दिले जात आहे. नेहरुंनी नेहमी लोकशाहीतील संस्थांप्रती आदर दाखवत त्यांना आणखी मजबूत करण्याची संस्कृती निर्माण केली. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच देशात लोकशाही मजबूत झाली.

यावेळी सोनिया गांधी यांनी नेहरुंचे आर्थिक मॉडेल आणि गटनिरपेक्ष केंद्रीत विदेश नीतिचेही स्मरण केले. नेहरुंनी ज्या लोकशाही मुल्यांना पुढे नेले. आज त्याच्याशी निगडीत वारशाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न होताना दिसतो. यावेळी थरुर यांनीही नेहरुंविषयी आपले मत व्यक्त केले.