मोर्सी समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये झालेल्या हिंसाचारात किमान १५० जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इजिप्तच्या लष्कराने मुस्लिम ब्रदरहूडच्या आंदोलकांवर सशस्त्र वाहने आणि बुलडोझर यांच्या सहाय्याने हल्ला चढविला. मोर्सी यांना पुन्हा एकदा सत्ताग्रहण करण्याची संधी मिळावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात होती. त्यामुळे त्यांच्या विरोधात हे पाऊल उचलणे भाग असल्याचे इजिप्तच्या गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात जाहीर केले आहे.
मुस्लिम ब्रदरहूडच्या दाव्यानुसार या क्रूर हल्ल्यात किमान २२०० जण ठार झाले असून, १० हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत. मात्र सरकारी सूत्रांनी मृतांचा हा आकडा १५० पेक्षा अधिक नसल्याचा तसेच जखमींची संख्या हजारांच्या घरात असल्याचा दावा केला आहे.