इजिप्तच्या सिनाई प्रांतात लष्कराने केलेल्या कारवाईत २९ दहशतवादी ठार झाले असून अन्य १३३ जणांना अटक करण्यात आल्याचे लष्कराच्या वतीने शनिवारी स्पष्ट करण्यात आले.
इजिप्तच्या राफाह, अल-अरिश आणि शेख झावयेद शहरांत २० ते ३० एप्रिल या कालावधीत कारवाई करण्यात आली, त्या दरम्यान १३३ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आणि दहशतवाद्यांचे ५१ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले, असे ब्रिगे. जन. मोहम्मद समीर यांनी सांगितले. या भागात आता तणावपूर्ण शांतता आहे.