News Flash

युपीमध्ये चकमकीदरम्यान पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार, उपअधीक्षकासह आठ पोलिसांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात गुंडाला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसावंर गोळीबार

उत्तर प्रदेशात चकमकीदरम्यान आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पोलीस उपअधीक्षकाचाही समावेश आहे. कानपूर येथे पोलीस विकास दुबे या गुंडाला अटक करण्यासाठी गेली असता ही चकमक उडाली. विकास दुबे याच्यावर ६० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलीस बिकरु गावात विकास दुबेच्या शोधात गेली असता गुंडांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांचं पथक विकास दुबेचा शोध घेत होते. त्याच्या जवळ पोहोचणार इतक्यात इमारतीवरुन पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार सुरु झाला. या हल्ल्यात पोलीस उपअधीक्षक देवेंद्र मिश्रा यांच्यासह तीन पोलीस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल यांचा मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शहीद झालेल्या पोलिसांसाठी शोक व्यक्त केला आहे. सोबतच आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 7:53 am

Web Title: eight cops including deputy sp killed in encounter in kanpur uttar pradesh sgy 87
Next Stories
1 ३७० कलम हटवून आणि कश्मीरचे विभाजन करूनही प्रश्न जैसे थे, शिवसेनेची मोदी सरकारवर टीका
2 टिकटॉकवर बंदी घालण्यास ‘सिलिकॉन व्हॅली’ही अनुकूल
3 ३८९०० कोटींच्या संरक्षणसामग्री खरेदीस मंजुरी
Just Now!
X