16 October 2019

News Flash

पॅरिसमधील आठशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक चर्च आगीच्या भक्षस्थानी; मनोरा कोसळला

या चर्चच्या बांधकामाला ११६० मध्ये सुरुवात झाली होती हे काम १२६० पर्यंत चालले. फ्रेंच गोथिक कॅथेड्रल या प्राचीन वास्तूरचनेचा हा एक अद्भुत नमुना मानला जातो.

पॅरिस : जगप्रसिद्ध बाराव्या शतकातील नोट्रे-डेम-कॅथेड्रल या चर्चा भीषण आग लागली असून त्याचा शिखराचा भाग जळून खाक झाला आहे.

जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असणारे पॅरिसमधील ‘नोट्रे-डेम-कॅथेड्रल’ हे १२व्या शतकातील ऐतिहासिक चर्च सोमवारी आगीच्या भक्षस्थानी पडले. या चर्चच्या छताचा भाग जळून खाक झाला असून याचा आकर्षक असा उंच मनोऱा या आगीत भस्मसात झाला आहे.

आग लागली त्यावेळी या चर्चच्या छतावरुन आगीचे मोठे लोट बाहेर पडत होते. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, असे स्थानिक अग्निशामक दलाने सांगितले आहे. दरवर्षी या चर्चाला लाखो पर्यटक भेट देतात. पॅऱिस शहराचे महापौरांची या आगीच्या घटनेला दुजोरा दिला आहे. सध्या ही आग नियंत्रणात आली असून या चर्चची गोथिक कॅथेड्रल मुख्य वास्तूरचना सुरक्षित राखण्यात यश आले आहे, अशी माहिती एएफपी या वृत्तसंस्थेने दिली.

नोट्रे-डेम-कॅथेड्रल या चर्चच्या बांधकामाला ११६० मध्ये सुरुवात झाली होती हे काम १२६० पर्यंत चालले. फ्रेंच गोथिक कॅथेड्रल या प्राचीन वास्तूरचनेचा हा एक अद्भुत नमुना मानला जातो. ६९ मीटर उंच असलेल्या या चर्चच्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी ३८७ पायऱ्या चढाव्या लागतात. विशेष म्हणजे फ्रेंच सम्राट नेपोलिअन बोनापार्टचा राज्यभिषेक याच चर्चमध्ये करण्यात आला होता.

First Published on April 16, 2019 8:01 am

Web Title: eight hundred years old world famous church in paris was fired