News Flash

मध्य प्रदेश : SUV आणि मोटारसायकलचा अपघातात ८ जणांचा मृत्यू

SUV चालक फरार, पोलीस तपास सुरु

मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यात सोमवारी दुपारी SUV आणि दोन मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात ८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मृतांमध्ये ४ लहान मुलांचाही समावेश आहे. छत्तरपूर-पन्ना रस्त्यावर चंद्रनगर आणि तोरिया गावाच्या मध्ये हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिली. अपघातात मृत पावलेल्या सर्व व्यक्ती या दोन मोटारसायकलवरुन प्रवास करत होत्या.

अपघातात मृत्यूमुखी पावलेल्या मुलांचं वय हे ६ ते १० वर्षापर्यंत असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. SUV चालवणाचा चालक गाडीतील एअरबॅगमुळे बचावला मात्र अपघात झाल्यानंतर त्याने घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात अपघाताचं नेमक्या कारणाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. पोलीस अधिकारी घटनास्थळावरुन पसार झालेल्या SUV चालकाचाही शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 5:33 pm

Web Title: eight killed in collision between suv and two motorcycles psd 91
Next Stories
1 आता काहीही झालं तरी कर्नाटकात पुन्हा लॉकडाउन नाही, येडियुरप्पांचा निर्धार
2 विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या, दुबईत भारतीय तरुणाला जन्मठेप
3 मोदींसारखं सक्षम नेतृत्त्व नसतं तर १३० कोटी जनता असुरक्षित असती – जे पी नड्डा
Just Now!
X