News Flash

करोनाच्या तावडीत जंगलाचा राजाही सापडला; हैद्राबादमधल्या ८ सिंहांना करोनाची लागण!

प्राणी संग्रहालयातल्या या सिंहांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. फक्त माणसंच नाही, तर आता प्राणीही करोनाच्या विळख्यात सापडल्याचं समोर येत आहे. हैद्राबादमधल्या नेहरु प्राणीसंग्रहालयातल्या ८ सिंहांना करोनाची लागण झाली आहे.

द हिंदूने दिलेल्या बातमीनुसार, या प्राणीसंग्रहालयातल्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला पुष्टी दिली आहे. या सिंहांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली आहे.या सिंहांना विलगीकरणात ठेवण्यात आलं असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.


या परिसरात खबरदारीच्या सर्व नियमांचं आता पालन करण्यात येत असून प्राणी संग्रहालय आता बाहेरील लोकांसाठी बंद करण्यात आलं आहे. द हिंदूने याविषयी दिलेल्या वृत्तानुसार, या सिंहांना कोरडा खोकला, नाक वाहणं, खाण्यापिण्याच्या तक्रारी अशी लक्षणं दिसून आल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. २४ एप्रिलला सिंहांना ही लक्षणं जाणवत असल्याचं प्राणी संग्रहालयाच्या केअरटेकर्सच्या लक्षात आलं होतं.

यापूर्वी अन्य देशात प्राण्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर येत होतं. मात्र, भारतात प्राण्यांना करोनाची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे.
या प्राणी संग्रहालयातल्या १२हून अधिक कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 4:57 pm

Web Title: eight lions tested positive for coronavirus in hyderabad vsk 98
Next Stories
1 ही अकार्यक्षमता नाही, तर देशवासीयांविषयीची असंवेदनशीलता; ओवेसी केंद्रावर भडकले
2 “नरेंद्र मोदींना भारतातलं करोनाचं संकट रोखता आलं असतं, पण…”, आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोदींवर परखड टीका!
3 “नेतृत्व आणि दूरदृष्टी नसल्याने ही स्थिती उद्भवली”, RBI माजी गर्व्हनर रघुराम राजन यांचं टीकास्त्र
Just Now!
X