News Flash

बिहारमध्ये नदीत होडी बुडाल्याने ८ जणांचा मृत्यू; बचाव कार्य अद्याप सुरु

क्षमतेपेक्षा जास्त लोकांनी भरलेली एक होडी कोसी नदीत पलटी झाली असून यात ८ जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात रविवारी मोठी दुर्घटना घडली. क्षमतेपेक्षा जास्त लोकांनी भरलेली एक होडी कोसी नदीत पलटी झाली असून यात ८ जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.


सुत्रांच्या माहितीनुसार, या घटनेची माहिती कळताच बचाव पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये ७ लोकांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, घटना घडली त्यावेळी या होडीतून किती लोक प्रवास करीत होते हे अद्याप कळू शकलेले नाही. या घटनेनंतर शेकडो लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. क्षमतेपेक्षा जास्त लोक या होडीत असल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यांत बिहारमधील छपरा येथे अशाच प्रकारे नदीत होडी पलटी झाल्याची घटना घडली होती. छपरा जिल्ह्यातील पानापुरा येथे ही घटना घडली होती. यामध्ये १५ लोक पाण्यात बुडाले होते. या बुडणाऱ्यांमधील सर्व लोक शेतकरी होते. तर सप्टेंबरमध्ये उत्तर प्रदेशातील बागपत येथील काठा गावात यमुना नदीत होडी पलटी झाल्याने ५० लोक बुडाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2018 7:58 pm

Web Title: eight people dead in bhagalpur after the boat they were travelling in capsized in kosi river seven people rescued
Next Stories
1 पोलीस भरतीदरम्यान उमेदवारांच्या छातीवर SC/ST लिहिल्याने वाद
2 मोदींकडून उद्घाटनापूर्वीच नेपाळमध्ये भारताने विकसित केलेल्या हायड्रोइलेक्ट्रिसिटी प्रकल्पात स्फोट
3 ‘नरेंद्र मोदी आणि डॉ. आंबेडकर ब्राह्मण; राम, कृष्णाला ब्राह्मणांनीच दिलं देवत्व’
Just Now!
X