20 September 2020

News Flash

मुलाचे अपहरण करुन खंडणीत मागितली काकू

हैदराबादमधील कोठकोटा येथे राहणाऱ्या आठ वर्षांच्या मुलाचे बुधवारी अपहरण झाले होते. या प्रकरणी मुलाच्या आजीने तेलंगणा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रेयसीला मिळवण्यासाठी २३ वर्षांच्या तरुणाने आठ वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना हैदराबादमध्ये घडली. अपहरणकर्त्या तरुणाचे मुलाच्या काकूशी प्रेमसंबंध होते. मुलाचे अपहरण केल्यानंतर आरोपीने त्याच्या कुटुंबीयांना फोन करुन लग्न लावून देण्याची मागणी केली आणि हा सर्व प्रकार समोर आला.

हैदराबादमधील कोठकोटा येथे राहणाऱ्या आठ वर्षांच्या मुलाचे बुधवारी अपहरण झाले होते. या प्रकरणी मुलाच्या आजीने तेलंगणा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. अपहरणानंतर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या वामसी कृष्णा (वय २३) या रिक्षाचालकाने मुलाच्या कुटुंबीयांना फोन केला. तुमच्या मुलाचे अपहरण झाले असून तो परत हवा असेल तर माझे त्याच्या काकूशी लग्न लावून द्या, असे त्याने फोनवर सांगितले. या प्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
तपासात कृष्णा हा ट्रेनमधून पुण्याच्या दिशेने जात असल्याचे समोर आले. तेलंगणा पोलिसांनी तातडीने पुणे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदत घेतली. सोमवारी सकाळी मुलाची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका करण्यात आली. पोलिसांना बघताच कृष्णाने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी शिताफीने त्याला अटक करुन तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात दिले.

कृष्णाचे त्याच्या शेजारी राहणाऱ्या विवाहितेशी प्रेमसंबंध होते. विवाहितेच्या कुटुंबीयांना काही दिवसांपूर्वीच याची माहिती मिळाली होती. त्यांनी कृष्णाला मारहाण करत घरात पाय ठेवायची हिंमत देखील करु नको, अशी धमकी दिली होती. यानंतर कृष्णाने प्रेयसीच्या घरातील आठ वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी कृष्णा त्या मुलाच्या शाळेत गेला. मुलाच्या आईचा अपघात झाल्याचे सांगत तो मुलाला व त्याच्या दोन चुलत भावांना घेऊन निघाला. कृष्णाला ओळखत असल्याचे त्या मुलांनीही सांगितले होते. त्यामुळे शाळेनेही मुलांना नेण्याची परवानगी दिली. यानंतर कृष्णाने मुलाच्या भावडांना एका ठिकाणी सोडून दिले आणि त्यानंतर मुलाला घेऊन तो महाराष्ट्राच्या दिशेने निघाला. पोलिसांनी कृष्णाला अटक केली असून अपहरण झालेला मुलगा सुखरुप असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 10:59 am

Web Title: eight year old boy kidnapped from hyderabad kidnapper wanted lady love as ransom
Next Stories
1 10 वीच्या विद्यार्थिनीला दिली चुकीची प्रश्नपत्रिका, पुन्हा परीक्षा घेण्याचा हायकोर्टाचा आदेश
2 पाकिस्तानच्या गोळीबारात दोन जवान शहीद; आज पुन्हा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन
3 भाजपा आमदाराच्या भावाला अटक, पीडितेच्या पित्याचा तुरुंगात झाला होता संशयास्पद मृत्यू
Just Now!
X