News Flash

बिहारमध्ये अल्पवयीन मुलांकडून आठ वर्षाच्या चिमुरडीची बलात्कार करुन हत्या

आरोपींनी आपण मुलीवर बलात्कार केल्याची कबुली दिली असली तरी पोलीस मात्र रिपोर्ट हाती येण्याची वाट पाहत आहेत

बलात्कार

बिहारमध्ये अल्पवयीन मुलांनी आठ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुरनिया जिल्ह्यात हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी मुलांचं वय १२ ते १५ दरम्यान आहे. तिसरा आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत. आरोपींनी आपण मुलीवर बलात्कार केल्याची कबुली दिली असली तरी पोलीस मात्र रिपोर्ट हाती येण्याची वाट पाहत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी मुलगी टीव्ही पाहण्यासाठी शेजाऱ्यांच्या घरी गेली असता तिचं अपहरण करण्यात आलं. रात्र झाली तरी मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरु केला होता.

सोमवारी सकाळी कुटुंबीयांना मुलीचा मृतदेह सापडला. यावेळी त्यांनी लोक काय म्हणतील या भीतीने शवविच्छेदन न करताच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला होता. पण आरोपींपैकी एकाने आपल्या मित्राला आपण एका मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची वाच्यता केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

आरोपीला स्थानिकांना पकडलं आणि मारहाण केली. यावेळी त्याने आपल्या साथीदाराचं नाव सांगितलं. यानंतर त्यालाही त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं. स्थानिकांनी दोन्ही आरोपींना पकडून पोलीस ठाण्यात ठाण्यात नेलं. मात्र पोलिसांच्या हाती सोपवण्याआधी दोन्ही आरोपींना जबरदस्त मारहाण करण्यात आली.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, तीन आरोपींपैकी दोघे अल्पवयीन आहेत. त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केलं असून बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध घेत आहोत असं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, अल्पवयीन आरोपी मुलीचे शेजारी असून त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. मुलीची हत्या करण्याआधी तिच्यावर बलात्कार केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मुलीच्या वडिलांनी मृतदेहाशेजारी रक्ताचे डाग दिसल्याचं सांगितलं होतं. यानंतर फॉरेन्सिक टीमने रक्ताचे नमुने घेतले असून रिपोर्टची वाट पाहत आहोत. रिपोर्ट आल्यानंतरच मुलीवर बलात्कार झाला होता की नाही याचा खुलासा होऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 12:37 pm

Web Title: eight year old girl gangraped by minors in bihar sgy 87
Next Stories
1 भारताची तुलना नाझी राजवटीशी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन पत्रकाराला हर्षा भोगलेंनी सुनावलं
2 औषधांच्या खोट्या जाहिराती केल्यास दाखल होणार फौजदारी खटला
3 असदुद्दीन ओवेसी अमित शाह यांच्यावर भडकले, म्हणाले तुम्हीच संसदेत सांगितलं…
Just Now!
X