News Flash

भाजपा खासदार रिटा बहुगुणा जोशी यांच्या कुटुंबावर शोककळा, फटाक्यांनी भाजल्याने सहा वर्षाच्या नातीचा मृत्यू

रुग्णालयात उपचारादरम्यान निधन

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून भाजपा खासदार असणाऱ्या रिटा बहुगुणा जोशी यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. फटाक्यांनी भाजल्याने रिटा बहुगुणा जोशी यांच्या सहा वर्षांच्या नातीचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. सकाळीच तिला उपचारासाठी दिल्लीला नेण्यात आलं होतं.

रिटा बहुगुणा जोशी यांचा मुलगा मयांक जोशी यांची सहा वर्षीय मुलगी दिवाळीमध्ये फटाके वाजवताना भाजली होती. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जवळपास ६० टक्के तिचं शरीर भाजल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मुलीची प्रकृती नाजूक असल्याने उपचारासाठी दिल्लीला हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

मुलीला रुग्णवाहिकेतून दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल आणण्यात आलं होतं. एम्समध्ये उपचार सुरु असतानाच मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला आहे.

मुलीने करोनाला हरवलं होतं
रिटा बहुगुणा जोशी उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीदेखील राहिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाली होती. इतर कुटुंबीयांची वैद्यकीय तपासणी केली असता नातीलाही करोना झाल्याचं निष्पन्न झालं होतं. दोघींनाही गुडगावमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान करोनावर मात करुन त्या घरी परतल्या होत्या.

उत्तर प्रदेशात फटाक्यावंर बंदी
उत्तर प्रदेश सरकारने फटाक्यांवर बंदी आणली आहे. दिवाळीच्या एक दिवस आधीपासून ते ३० नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांच्या विक्री आणि फोडण्यावर बंदी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 12:05 pm

Web Title: eight year old granddaughter of bjp mp rita bahuguna joshi died after getting burnt due to firecrackers sgy 87
Next Stories
1 …म्हणून सोनिया गांधींनी पंतप्रधानपदी मनमोहन सिंग यांना निवडलं; ओबामांनी सांगितलं राहुल कनेक्शन
2 सिब्बल यांना अंतर्गत मुद्दे माध्यमासमोर मांडायची गरज नव्हती – गेहलोत
3 दिलासादायक – देशात २४ तासांत ४० हजार ७९१ जणांची करोनावर मात
Just Now!
X