राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगण या पाच राज्यांसाठी निवडणुका पार पडल्या. आता या निवडणुकांचे निकाल ११ डिसेंबरला लागणार आहेत. मात्र एक्झिट पोलचे अंदाज येण्यास सुरुवात झाली आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यात भाजपाला सत्ता गमवावी लागणार असा अंदाज विविध एक्झिट पोल्सनी व्यक्त केला आहे. असे झाले तर भाजपासाठी हा मोठा धक्का असणार आहे.

कोणाचा सर्वे काय सांगतो?
एबीपी, लोकनीती, सीएसडीएसच्या सर्वेनुसार मध्यप्रदेशात काँग्रेसला १२६ जागा मिळतील तर भाजपाला ९४ जागा मिळतील. म्हणजेच काँग्रेसची एकहाती सत्ता येणार आहे असे हा पोल दाखवतो.

इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार भाजपाला मध्यप्रदेशात १०२ ते १२० च्या आसपास जागा मिळतील तर काँग्रेसला १०४ ते १२२ जागा मिळतील. याचा अर्थ दोन्ही पक्षांना सत्तास्थापनेची संधी मिळू शकते. असे या पोलनुसार व्यक्त होते आहे कारण मध्यप्रदेशात ११६ हा बहुमताचा आकडा आहे.

इंडिया टुडे, अॅक्सिस आणि माय इंडियाच्या सर्वेनुसार राजस्थानमध्ये भाजपाला ५५ ते ७२ जागा मिळतील, तर काँग्रेसला ११९ ते १४१ जागा मिळतील. राजस्थानमध्ये २०० जागांसाठी मतदान झाले आहे. ज्या पक्षाला १०१ जागा मिळतील त्यांचे सरकार येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी कमळ फुलणार नाही तर हाताला साथ मिळेल असे हा अंदाज सांगतो आहे.

न्यूज नेशनने दिलेल्या पोलनुसार राजस्थानमध्ये काँग्रेसला ११० ते १२० जागा मिळतील तर भाजपाला ७० ते ८० जागांवर समाधान मानावे लागेल. तर न्यूज नेशनच्या अंदाजानुसार राजस्थानमध्ये भाजपाला ८९ते ९३ जागा मिळतील तर काँग्रेसला ९९ ते १०३ जागा मिळतील म्हणजेच राजस्थानात काँग्रेसची सत्ता येईल असा अंदाज व्यक्त होतो आहे.

CVOTER च्या सर्वेनुसार राजस्थानमध्ये भाजपाला ५२ ते ६८ जागा मिळतील आणि काँग्रेसला ८१ ते १०१ जागा मिळतील.

टाइम्स नाऊ सीएनएक्सच्या सर्वेनुसार राजस्थानात काँग्रेसला १०५ जागा तर भाजपाला ८५ जागा मिळतील

इंडिया टुडेच्या सर्वेनुसार राजस्थानात काँग्रेसला ११९ ते १४१ जागा मिळतील तर भाजपाला ५५ ते ७२ जागा मिळतील

इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या सर्वेनुसार राजस्थानात काँग्रेसला ११९ ते १४१ जागा मिळतील तर भाजपाला ५५ ते ७२ जागा मिळतील

इंडिया टुडेच्या सर्वेनुसार तेलंगणमध्ये टीआरएसला ७९ ते ९१ जागा, काँग्रेसला २१ ते ३३ जागा आणि भाजपाला १ ते ३ जागा मिळतील असा अंदाज आहे

इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या सर्वेनुसार छत्तीसगडमध्ये भाजपाला २१ ते ३१ जागा तर काँग्रेसला ५५ ते ६५ जागा मिळतील असा अंदाज आहे

न्यूज नेशनच्या सर्वेनुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेसला ४१, भाजपाला ३८ आणि इतरांना १७ जागा मिळतील