पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नेमलेल्या भरारी पथकाने ६२ कोटी रुपयांहून अधिक बेकायदेशीर रोकड जप्त केली असून त्यापैकी सर्वाधिक म्हणजे २४.९० कोटी रुपये तामिळनाडूतून जप्त करण्यात आले आहेत.

पश्चिम बंगालमधून १२.८४ कोटी रुपये तर आसाममधून १२.३३ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. केरळमधून ११.७३ कोटी रुपये तर पुडुचेरीमधून ६०.८८ लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे.

आतापर्यंत एकूण ६२.४१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने नेमलेल्या भरारी पथकांनी  रोकड जप्त केली आहे.

आठ उमेदवार बदलले तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी सोमवारी आठ उमेदवार बदलले. नव्या यादीत  तीन मंत्री आणि एका माजी कॅबिनेट मंत्र्याला उमेदवारी दिली आहे.