तामिळनाडूतील वेल्लोर लोकसभा मतदारसंघासाठी ५ ऑगस्ट रोजी निवडणुक होत आहे. निवडणुक आयोगाने यासाठीची अधिसुचना जाहीर केली आहे. निवडणुक आयोगाने माहिती दिली आहे की, लोकसभेच्या या जागेसाठी ५ ऑगस्ट रोजी मतदान होईल व ९ ऑगस्ट रोजी निकाल घोषित होणार आहे.

गत लोकसभा निवडणुकीत देशभरातील ५४३ पैकी ५४२ जागांसाठी मतदान झाले होते. तर एकमेव वेल्लोर मतदार संघाची निवडणुक कॅश-फॉर-वोट प्रकरणामुळे रद्द करण्यात आली होती. या ठिकाणी मतदानाच्या दोन दिवस अगोदर मोठ्याप्रमाणात पैसे आढळून आले होते. एका गोदामातुन तब्बल ११.५ कोटी रूपये रोख जप्त करण्यात आले होते. यानंतर निवडणुक आयोगाने राष्ट्रपतींनी वेल्लोस मधील निवडणुक रद्द करण्याची विनंती केली होती. ही विनंती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्य केल्याने या ठिकाणी निडवणुक घेण्यात आली नव्हती.