सय्यद शूजा या हॅकरने 2014 च्या निवडणुका इव्हीएममध्ये घोटाळा करुन जिंकण्यात आल्या असा गौप्यस्फोट केला. तसेच या घोटाळ्याबाबत गोपीनाथ मुंडे यांना ठाऊक होते म्हणूनच त्यांची हत्या झाली असाही आरोप सय्यद शुजाने केला. निवडणूक आयोगाने हे सगळे दावे फेटाळले आहेत. तसेच आज निवडणूक आयोगाने दिल्ली पोलिसांना एक पत्र लिहिले त्यामध्ये सय्यद शूजा विरोधात तक्रार दाखल करा असेही म्हटले आहे. निवडणूक आयोगाने दिल्ली पोलिसांना ही विनंती केली आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुका या इव्हीएममध्ये घोळ करुन त्यांचे निकाल नियोजित करण्यात आले होते. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यांच्या निवडणुकाही मॅनेज करण्यात आल्या होत्या असाही आरोप सय्यद शुजा या सायबर एक्स्पर्टने केला. यानंतर भाजपाने या सगळ्या पत्रकार परिषदेमागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला. तर काँग्रेसने मात्र हा आरोप फेटाळला आहे. दिल्ली पोलिसांना केलेल्या विनंतीनंतर आता दिल्ली पोलीस काय करणार ते पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.