06 March 2021

News Flash

निवडणूक आयोगाचा कमलनाथ यांना दणका; स्टार प्रचारकाचा दर्जा केला रद्द

निवडणूक आदर्श आचारसंहितेचे पुन्हा केले उल्लंघन

(संग्रहित छायाचित्र)

मध्य प्रदेश काँग्रेसला निवडणूक आयोगानं मोठा झटका दिला आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा आयोगानं काढून घेतला आहे. कमलनाथ यांनी पुन्हा एकदा निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर आयोगाने ही कारवाई केली.

निवडणूक आयोगानं कमलनाथ यांचा स्टार प्रचारक दर्जा काढून घेतल्यानंतर म्हटलं की, “यापुढे जर कमलनाथ यांनी एकही प्रचारसभा केली तर त्याचा संपूर्ण खर्च हा त्या मतदारसंघातील उमेदवाराकडून वसूल केला जाईल.”

निवडणूक आयोगानं यापूर्वी कमलनाथ यांच्याविरोधात वादग्रस्त ‘आयटम’ विधानाप्रकरणी नोटीस पाठवली होती आणि ४८ तासांत याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान कमलनाथ यांनी भाजपाचे उमेदवार इमरती देवी यांना कथीतरित्या आयटम संबोधले होते. यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटलं की, “मी कोणाला असं बोललो नाही. जर यामुळे संबंधित व्यक्ती दुखावली गेली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, माझं तसं म्हणण्याचा हेतू नव्हता.”

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले होते की, “काँग्रेसचा उमेदवार हा सिंपल व्यक्ती आहे तर विरोधकांचे उमेदवार इमरती देवी या आयटम आहेत. या वादग्रस्त विधानानंतर मोठा राजकीय गदारोळ झाला होता. यावर कमलनाथ म्हणाले होते की, “आयटम हा वाईट शब्द नाही, त्याला त्या पद्धतीने घेता कामा नये.”

राष्ट्रीय महिला आयोगाने देखील याप्रकरणी कमलनाथ यांच्याकडून स्पष्टीकरण मागवलं होतं. तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कमलनाथ यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 6:04 pm

Web Title: election commission slaps kamal nath star promoter status revoked aau 85
Next Stories
1 Video : तेजस्वी यादव यांच्या प्रचारसभेत हेलिकॉप्टरभोवती सेल्फीसाठी झाली तोबा गर्दी
2 “अल्लाहचा संदेश घेऊन येणाऱ्याला…”; झाकीर नाईकचा मॅक्रॉन यांना इशारा
3 काश्मीरमधील ‘त्या’ भाजपा नेत्यांच्या हत्येमागे लष्कर-ए-तोयबाचा हात – पोलीस महानिरिक्षक
Just Now!
X