माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या पश्चात अण्णा द्रमुकचे भवितव्य काय, असा प्रशद्ब्रा तमिळनाडूच्या राजकारणात नेहमी उपस्थित के ला जातो. पक्षाला सत्ता गमवावी लागली असली तरी ७५ पेक्षा जास्त जागा जिंकू न पक्षाने राज्यात आपला प्रभाव कायम असल्याचे दाखवून दिले.

लागोपाठ दहा वर्षे सत्तेत असलेल्या अण्णा द्रमुकला सरकारच्या विरोधातील नाराजीचा मोठा फटका बसला. लोकसभा निवडणुकीत राज्यातील ३९ पैकी फक्त एक जागा अण्णा द्रमुकला मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पार धुव्वा उडाला होता. विधानसभा निवडणुकीतही पक्षाला असाच मोठा फटका बसेल आणि अण्णा द्रमुक हळूहळू प्रभावहिन होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. अण्णा द्रमुक किं वा द्रमुक या दोन दव्रिडी पक्षांमध्ये एक पक्ष कमकु वत झाल्याशिवाय हातपाय पसरता येणार नाहीत हे भाजपच्या धुरिणांचे गणित आहे. यामुळेच अण्णा द्रमुकमधील घडामोडींकडे भाजपचे अधिक लक्ष होते. जयललिता यांच्या निधनानंतर मावळते मुख्यमंत्री पलानीसामी आणि उपमुख्यमंत्री पेनीरसेल्वम यांना एकत्र आणण्यात भाजपच्या नेतृत्वाने प्रयत्न के ले होते. महाराष्ट्रात शिवसेना, आसाममध्ये आसाम गण परिषद किं वा गोव्यात महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला बरोबर घेऊन भाजपने आपली ताकद वाढविली व मग याच पक्षांना जागा दाखवून दिली होती. तमिळनाडूमध्ये भाजपचा हाच प्रयत्न होता, पण या निवडणुकीत अण्णा द्रमुकने आपला प्रभाव कायम राखला.

जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकमध्ये मोठी फू ट पडेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. जयललिता यांची मैत्रीण शशिकला यांची राजकीय महत्त्वाकांक्षा उफाळून आली होती. पेनीरसेल्वम यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यात आले. यातून पक्ष तग धरेल का, अशी शक्यता वर्तविली जात होती. पलानीसामी यांना मुख्यमंत्रिपद तर पेनीरसेल्वम यांच्याकडे पक्षाची सूत्रे असा तोडगा कढण्यात आला. शशिकला तुरुंगात गेल्याने पक्षाच्या कारभारात त्यांचा हस्तक्षेप नव्हता. साडेचार वर्षे सरकार टिकले. विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये अण्णा द्रमुकला चांगले यश मिळाले. लोकसभा निवडणुकीत पार धुव्वा उडाला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असावा यावरून पलानीसामी आणि पेनीरसेल्वम यांच्यात धुसफू स झाली होती.

पाच वर्षांपूर्वी जयललिता या पुन्हा सत्तेत आल्या तेव्हा द्रमुक आघाडीने १००च्या आपसास जागा जिंकल्या होत्या. अण्णा द्रमुकला सत्ता गमवावी लागली असली तरी पक्षाला अगदीच बेदखल झालेला नाही.