News Flash

धक्कादायक! गावकऱ्यांनी फेकलेला जळता टायर हत्तीच्या कानात अडकला आणि त्यानंतर…

घटनेचा व्हिडीओ व्हायरल

गावकऱ्यांनी पेटवून दिल्याने हत्तीला प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. तामिळनाडूत हा प्रकार घडला आहे. हत्तीला पळवून लावण्यासाठी गावकऱ्यांनी जळता टायर त्याच्या दिशेने फेकला होता अशी माहिती समोर आली आहे. जळता टायर हत्तीच्या कानात अडकला आणि यामुळे त्याची धावपळ झाली. मसिनागुडी येथे झालेल्या या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हत्तीला पळवून लावण्यासाठी जळत्या गोष्टी त्याच्या दिशेने फेकत असल्याचं दिसत आहे. आगीमुळे हत्तीची पाठ आणि कान पूर्णपणे जळालं होतं. १९ जानेवारीला वैद्यकीय उपचारासाठी हत्तीला नेलं जात असताना त्याचा मृत्यू झाला.

हत्तीची प्रकृती अत्यंत ढासळली होती. वैद्यकीय उपचारासाठी नेण्यापूर्वी हत्तीला शांत करण्यात आलं होतं. मात्र उपचाराला जात असतानाच हत्तीचा मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी फरार असल्याचं मसिनागुडी व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 8:28 pm

Web Title: elephant dies after villager sets its ear on fire in tamil nadu nilgiris sgy 87
Next Stories
1 “हा तर आमचा अपमान, ट्रॅक्टर मोर्चा काढणारच,” कृषीमंत्र्यासोबतच्या बैठकीनंतर शेतकऱ्यांचा संताप
2 लालूप्रसाद यांची प्रकृती खालावली; मुलगी रुग्णालयात पोहोचली
3 राहुल गांधींसमोर काँग्रेसच्या दोन गटांमध्ये खडाजंगी; अध्यक्षपदाबाबत मोठा निर्णय
Just Now!
X