तामिळनाडूच्या धर्मपुरी भागात ५० फूट खोल विहीत पडलेल्या हत्तीची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे. गुरुवारी पंचमपल्ली भागातील येलुगुंडर गावात अंदाजे ८ वर्षाचा हत्ती विहीरत पडला. गावकऱ्यांनी कोरड्या विहीरीत हत्तीला पडलेलं पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ वनखात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. विहीरीबाहेर गावकऱ्यांची गर्दी पाहून हत्ती आत बिथरला होता.

अखेरीस वन खात्याचे अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी यांनी १४ तासांनंतर अथक प्रयत्न करुन या हत्तीला विहीरीबाहेर काढलं. दोनवेळा हत्तीला गुंगीचं इंजेक्शन मारुन त्याला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलं.

हत्तीची सुखरुप सुटका केल्यानंतर प्राण्यांच्या डॉक्टरांनी त्याच्या सर्व वैद्यकीय तपासण्या केल्या असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना दिली. सोशल मीडियावर या हत्तीला बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या प्रयत्नांचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात येत आहे.